मालवण/-
सध्याच्या दिवसात कोरोना रुग्ण सापडताच कोरोनाग्रस्त आणि त्यांच्या घरच्या लोकांशी संपर्क टाळला जातो. त्यांना कोणी भेटू शकत नाही आणि ते पूर्णपणे एकटे पडतात. अशावेळी त्यांना औषधोपचारा बरोबरच मानसिक आधाराची गरज असते. अशा या कोरोना सारख्या महामारीच्या काळात रुग्णाच्या घरच्यांना आणि मित्रमंडळींना भेटण्यास परवानगी नसते. त्यामुळे कोविड आइसोलेशन वॉर्डमध्ये असलेले रुग्ण आपलेच कुटुंबातील सदस्य असल्यासारखे आहेत हेच हेरुन त्यांचे मनोबल वाढविण्याच्या दृष्टीने अमेय देसाई यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन अमेय देसाई मित्रमंडळाच्यावतीने आठवडा भर विविध स्तुत्य उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत गरम पाण्याची वाफ घेणे त्यासाठी लागणारे स्टीमर (वाफ घेण्याचे यंत्र) तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपयुक्त अशी विविध फळे उकडलेली अंडी याचे वाटप अमेय देसाई यांच्यावतीने करण्यात आले.
यावेळी डॉ. बालाजी पाटील, अमेय देसाई, मंदार ओरसकर, केदार देसाई, अंतोन काळसेकर, अॅड. रोहित गरगटे, दर्शन गावकर, हितेंद्र हिर्लोस्कर, तुषार मेस्त्री, वैभव मेस्त्री, महेंद्र पारकर, हेमंत रामाडे, विघ्नेश मांजरेकर, वैभव खोबरेकर तसेच आयसोलेशन वॉर्डमधील डॉक्टर, परिचारिका उपस्थित होते. डॉ. बालाजी पाटील यांनी सर्व उपस्थित अमेय देसाई मित्रमंडळाच्या या कार्याचे कौतुक करून आभार मानले. त्याचप्रमाणे आयसोलेशन वॉर्डमधील रुग्णांनी देखील आभार मानले.
अमेय देसाई यांनी डॉ. बालाजी पाटील यांच्याकडे कोरोनाग्रस्त रुग्णांबद्दल विचारपूस करून आयसोलेशन वॉर्डमध्ये काही आवश्यकता भासल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.