मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये:- मत्स्यव्यवसाय विभागाचे आवाहन.

मालवण/-

हवामान विभागाने आज व उद्या वारे व गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये. याची नोंद सर्व मत्स्य सहकारी संस्था, नौका मालकांनी घ्यावी. आपल्या नौका सुरक्षित बंदरात ठेवाव्यात. जास्तीत जास्त मच्छीमारांना याची माहिती देत विशेष काळजी व दक्षता घ्यावी असे आवाहन येथील मत्स्यव्यवसाय विभागाने केले आहे.

अभिप्राय द्या..