वेंगुर्ला शहरामध्ये भुमिगत वीजवाहिनी घालणाऱ्या ठेकेदाराने रस्त्यावरील चर त्वरित बुझवावेत.;ऍड.मनिष सातार्डेकर यांची मागणी..

वेंगुर्ला शहरामध्ये भुमिगत वीजवाहिनी घालणाऱ्या ठेकेदाराने रस्त्यावरील चर त्वरित बुझवावेत.;ऍड.मनिष सातार्डेकर यांची मागणी..

वेंगुर्ला /-

वेंगुर्ला शहरात सध्या भुमिगत विजवाहिनी घालण्याचे काम सुरु असून सदरचे काम करताना ठेकेदारांनी रस्त्याच्या मधोमध चर खोदलेले असुन ते अद्याप बुझवलेले नाहीत व त्याचा प्रचंड त्रास वाहनचालक व पादचाऱ्याना देखील होत आहे.याबाबत वाहनचालक व शहरातील नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने रस्त्यावरील चर त्वरित बुझवावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा ऍड.मनिष
सातार्डेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.यावेळी ऍड.सातार्डेकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की,वेंगुर्ला शहरात सध्या भुमिगत विजवाहिनी घालण्याचे काम सुरु असून सदरचे खोदकाम करताना वाहतुकीसाठी लागणारे कोणतेच नियोजन ठेकेदाराने तथा संबंधित प्रशासनाने केलेले नाही.सदर खोदाईच्या वेळी लागणारे वाहतुकीचे नियोजन नसल्याने सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होते.तसेच सदरचे काम करताना ठेकेदाराने रस्त्याच्या मधोमध चर खोदलेले असुन ते अद्याप बुझवलेले नाहीत व त्याचा प्रचंड त्रास वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना देखील होत आहे. संबंधित प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. सदरचे काम करताना ठेकेदारांनी रस्त्याच्या मधोमध चर खोदलेले असुन ते अद्याप बुझवलेले नाहीत. त्यामुळे संबंधित
प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. तसेच खोदलेले चर त्वरित बुझवण्याची आवश्यकता असुन सदरच्या चरामधे गाडी जाऊन छोटे-मोठे अपघात देखील होत असून एखादा मोठा अपघात होऊन त्यात कोणाला आपले प्राण गमवावे लागल्यास किंवा गंभीर दुखापत झाल्यास त्यास केवळ संबंधित ठेकेदार तसेच
प्रशासकीय अधिकारी किंवा प्रशासन जबाबदार असेल,असा इशारा अॅड, मनिष सातार्डेकर यांनी दिला आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार तसेच संबंधित प्रशासन व वेंगुर्ला नगरपरिषद यांनी वाहतुकीचे योग्य नियोजन करुन तसेच वरील नमूद बाबींची योग्य ती काळजी घेऊन मगच रस्ते खोदाईचे काम करावे ससेच रस्त्याच्या मधोमध खोदलेले चर त्वरीत बुझवावेत अन्यथा त्याचे गंभीर परिणाम संबंधिताना भोगावे लागतील,असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अॅड.
मनिष सातार्डेकर यांनी दिला आहे.

अभिप्राय द्या..