कुडाळ /-
आजाराला कंटाळून हळदीचे नेरूर तिवरवाडी सचिन चंद्रकांत निकम ३० या युवकाने आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.
या घटनेची फिर्याद सुरेश चंद्रकांत निकम यांनी कुडाळ पोलिसात दिली असून यानुसार सचिन याने आजाराला कंटाळून हळदीचे नेरूर येथील महात्मा शेळ येथे आत्महत्या केल्याची फिर्याद कुडाळ पोलिसात दिली आहे. ही घटना सकाळी ८ वा.निदर्शनास आली.