वेंगुर्ला /-
माजी खासदार आणि भाजपाचे प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आज रेडी येथे जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ यांच्या आयोजनाने जर्मन टेक्नॉलॉजीच्या अद्ययावत मशिनवर संपूर्ण शरीर तपासणी शिबीर घेण्यात आले.
रेडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे घेण्यात आलेल्या या आरोग्य शिबिरात ३२ जणांची मोफत तपासणी करण्यात आली.जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ यांनी आयोजित केलेल्या या शिबिराचे उद्घाटन कार्यक्रमाला व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ, रेडी सरपंच रामसिंग उर्फ भाई राणे, वेंगुर्ले पंचायत समिती सदस्य मंगेश कामत, निसर्ग उपचार तज्ञ डॉ. प्रमोद ढेरे, रेडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.शुक्ला, रेडी तंटामुक्ती समिती अध्यक्ष प्रभाकर राऊळ,रेडी ग्रामपंचायत सदस्य आनंद भिसे,शैलेश तिवरेकर,आरवली ग्रामपंचायत सदस्य सोनाली कुडव, सागरतीर्थ ग्रामपंचायत सदस्य गायत्री गोडकर,भाजपा रेडीगाव अध्यक्ष जगन्नाथ राणे, शक्ती केंद्रप्रमुख महेश कोनाडकर, देवेंद्र मांजरेकर, देवेंद्र राऊळ, सागर राणे, ओंकार कोनाडकर, महिला अध्यक्ष श्रद्धा धुरी, तळवडे येथील भक्ती भिसे,भाजपा कार्यकर्ते आदी उपस्थित होते.तसेच शिबिरादरम्यान भाजपाचे वेंगुर्ला तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक सुहास गवंडळकर, ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर, शिरोडा ग्रामपंचायत सदस्य राहुल गावडे आदीही उपस्थित होते.