महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहिर..

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहिर..

कुडाळ /-

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी आज कुडाळ एम.आय.डिसी येथील विश्राम गृह येथे जाहिर करण्यात आली.जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांनी आज कुडाळात केली जिल्हा कार्यकारिणीची निवड.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हयाची कार्यकारणी आज जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांनी जाहीर केली असून जिल्हा उपाध्यक्ष पदी समिल जळवी,प्रमोद गवस, सचिव पदी कृष्णा सावंत, शिरीष नाईक, खजिनदार पदी सौ. संजना हळदिवे आणि सहखजिनदार पदी संजय भाईप यांची तर जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रसन्ना गोंदावळे,विष्णू धावडे,मिलिंद धुरी, आनंद कांडरकर,आणि सल्लागार पदी अँड सिद्धिका भांडये राजेश हेदळकर यांची एकमताने निवड करण्यात आली.

कुडाळ येथील शासकीय विश्रामगृहात जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला पत्रकार तुळशीदास नाईक,सुमित दळवी,प्रशांत गवस,विनय वाडकर,गोविंद शिरसाट यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते, या वेळी बोलताना आबा खवणेकर यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कार्याची उद्दिष्टांचा माहिती देत यापुढे जिल्ह्यात पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी तसेच अडी अडचणींसाठी सर्वानी एकत्र येऊन लढा देणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.आज अकरा जणांची कार्यकारणी जाहिर झाली असून येत्या काही दिवसांत आठही तालुक्यात तालुका कार्यकारिणी जाहिर करण्यात येणार असल्याचे सांगितले.यावेळी नवनिर्वाचित सर्व पदाधिका~यांचे जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांनी अभिनंदन केले आहे.

अभिप्राय द्या..