नेमळे पंचक्रोशी विद्यालयाचा वेदांत राऊळ वक्तृत्व स्पर्धेत जिल्ह्यात तृतीय..

नेमळे पंचक्रोशी विद्यालयाचा वेदांत राऊळ वक्तृत्व स्पर्धेत जिल्ह्यात तृतीय..

वेंगुर्ला /-

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सिंधुदुर्ग आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त नुकतीच ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत महाराष्ट्रात स्त्रियांवरील वाढते अत्याचार हा संवेदनशील विषय देण्यात आला होता. या स्पर्धेत नेमळे पंचक्रोशी उच्च माध्यमिकचा इयत्ता अकरावीचा विद्यार्थी वेदांत अरुण राऊळ यांने या स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला. या स्पर्धे साठी त्याला प्रा.वैभव खानोलकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल या प्रशालेच्या मुख्याध्यापिका बोवलेकर,संस्था अध्यक्ष राऊळ,संस्था पदाधिकारी यांनी यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले आहे.

अभिप्राय द्या..