वेंगुर्ला /-
होळी आणि रंगपंचमी निमित्त होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्या साठी आज हिंदू जनजागृती समितीच्या वतीने वेंगुर्ल्याचे तहसीलदार प्रवीण लोकरे आणि प्रभारी पोलिस अधिकारी साहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावळे यांना निवेदन देण्यात आले.
वेंगुर्ला तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना समितीच्यावतीने महेश जुवलेकर, पत्रकार दाजी नाईक, प्रविण कांदळकर, गोपाळ जुवलेकर यांनी हे निवेदन सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की, सार्वजनिक ठिकाणी रंग खेळणे, मार्गस्थ आणि स्त्रिया यांवर फुगे मारणे, सार्वजनिक ठिकाणी मध्यपान व धुम्रपान करणे आणि पार्ट्या करणे यास प्रतिबंध करण्यात यावा, तसेच बळजबरीने रंग फासून फुगे मारणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, आरोग्याला घातक, तसेच प्रतिबंधित रासायनीक रगांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, ठीकठिकाणी पोलिसांच्या वतीने गस्तीपतके तैनात करण्यात यावीत. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या काळात अशी कृत्ये करणाऱ्या तरुणांना त्वरित ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
या बरोबरच प्रबोधनपर हस्तपत्रकांचे वितरण करणे, सामाजिक संस्थांच्या साहास्याने चळवळी राबवणे आदी जनजागृती करणाऱ्या उपाय योजना कराव्यात.’कचऱ्याची होळी, या पर्यावरणास घातक असलेल्या संकल्पना राबवू नये, यासाठी तसेच चांगल्या वृक्षांच्या फांद्या न तोडता धर्मशास्त्र समजून होळी करावी.
सध्या कोरोना’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर एकमेकांना रंग लावल्याने कोरोना संसर्गाचा धोका अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे धुलीवंदन आणि रंगपंचमी या दिवशी जसे शिवजयंतीसह विविध उत्सवांवर निर्बंध घालण्यात आले होते, त्यानुमार प्रशासवाने कठोर निर्बंध घालावेत, तसेच चिनी रंग, पिचकारी, फुगे आदींच्या विक्रीवर बंदी घालाची असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page