कुडाळ /-
शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननिय श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने, तसेच शिवसेना सचिव तथ सिंधुदुर्ग/रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री.विनायक राऊत साहेब व सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख मा.अरुणभाई दुधवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री उदय सामंत आणि कुडाळ/ मालवण चे आमदार वैभव नाईक यांच्या शिफारशी मुळे आज शिवसेनेचे युवानेते श्री.रुपेश अशोक पावसकर यांची शिवसेना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ओ. बी. सी. (OBC) जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.आणि त्यांना तसे नियुक्ती पत्र ही त्यांना देण्यात आले आहे.या निवडीनंतर रुपेश पावसकर यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.रुपेश पावसकर यांचे समाजकार्य चांगले आहे.पावसकर यांच्याजवळ च्याजवळ संघटना कौशल्य चांगल्या प्रकारे आहे.याच कारणास्तव त्यांना ओबीसी च्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.