४५ वर्षांवरील नागरिकांना मोफत कोविड लसीकरणाचा कुडाळ येथे शुभारंभ..

४५ वर्षांवरील नागरिकांना मोफत कोविड लसीकरणाचा कुडाळ येथे शुभारंभ..

खा. विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त आ. वैभव नाईक यांचा उपक्रम..

कुडाळ /-

शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ मालवण मतदारसंघातील ४५ वर्षांवरील नागरिकांना मोफत कोविड लसीकरणाचा (कोविशील्ड) शुभारंभ कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आला. आमदार वैभव नाईक यांच्या वतीने नाव नोंदणी केलेल्या नागरीकांना कुडाळ मधील सुयश हॉस्पिटल येथे मोफत कोविड लस देण्यात येत आहे. आ. वैभव नाईक यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

यावेळी डॉ. संजय केसरे म्हणाले, कोविड लस हि प्रभावशाली आहे. कोरोना विरुद्ध लढण्यासाठी नागरिकांना संरक्षक ठरत आहे. आ. वैभव नाईक यांनी ४५ वर्षांवरील नागरिकांना मोफत लस देण्याचा केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. यामुळे गरीब गरजुंना याचा लाभ होणार आहे. असे त्यांनी सांगत याप्रसंगी आमदार वैभव नाईक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक,तालुका संघटक बबन बोभाटे, विकास कुडाळकर,उपसभापती जयभारत पालव, पं. स. सदस्या श्रेया परब, शहरप्रमुख संतोष शिरसाट, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट,अतुल बंगे, नगरसेवक सचिन काळप, संजय भोगटे, रुपेश पावसकर, श्रेया गवंडे, मेघा सुकी, नितीन सावंत, राजू गवंडे,संदीप म्हाडेश्वर ,रुग्णालयाच्या कविता ठाकूर, उत्कर्ष नेवगी, एकता मेस्त्री, अमर कुडाळकर यांसह नागरिक उपस्थित होते.

अभिप्राय द्या..