कुडाळ शहरातील गोदडवाडी/शिवाजी नगर येथील युवकांचा मनसेत प्रवेश..

कुडाळ शहरातील गोदडवाडी/शिवाजी नगर येथील युवकांचा मनसेत प्रवेश..

कुडाळ /-

महाराष्ट्र नवनिर्माण सेना वर्धापन दिन तसेच सदस्य नोंदणी उपक्रमाचे औचित्य साधून आज कुडाळ शहरातील युवकांनी मोठ्या संख्येने मनसे पक्षात प्रवेश केला. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन जिल्हाध्यक्ष धीरज परब त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आज हा प्रवेश करण्यात आला. प्रसंगी जिल्हाध्यक्ष धीरज परब व रवी निगुडकर वाहतूक सेना चिटणीस मुंबई, बनी नाडकर्णी परिवहन सेना उपाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते आजचा हा छोटेखानी कार्यक्रम झाला. प्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी आणि रवी निगुडकर यांनी पक्षाची ध्येयधोरणे ,पक्षाची कामाची पद्धती, राजसाहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र, याबाबत मार्गदर्शन केले .पक्षातील कामाचे अनुभव पंधरा वर्षातील जनसामान्यांसाठी चा लढा असे बरेच विषय चर्चिले गेले. दरम्यान
सदस्य नोंदणी मोहीम महाराष्ट्रात जोरात चालु आहे.आज नविन सदस्याची नोंदणी झाली असुन ,
जिल्हातील मनसे पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडिया मधील बडबड थांबून प्रत्येक्षात जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे ,जनसंपर्क वाढवायचा आहे. सदस्य संख्या वाढवायची आहे तरच पक्ष वाढ शक्य आहे. असे परब म्हणाले.
यावेळी प्रवेश कर्त्या मध्ये
आदिल शेख ,राम नाईक ,साईनाथ नाईक,सादिक गोदड,जहीर गोदड,शाहिद गोदड,अमित करंगुटकर ,समीर शेख,यासीम मुल्ला,आनंद सावंत, जहीर गोदड, राहील एइब्राहिम शाहा,मूनवर शेख,नियाज शेख,सर्फराज गोदड,परवेझ शहा,निज शहा,अल्ताफ मुल्ला,शेजाद शहा,नियो शहा,म्हम्म्मद शहा
यांच्यासह अन्य जणांनी मनसेत प्रवेश केला ..
राहील शहा सह सहकारी यांनी गोरगरीबांचे प्रश्न सोडवणारी संघटणा या दृष्टीने आपण मनसे पक्षाला पसंती दिली. गोरगरीब सामान्य लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे म्हणाले यावेळी उपतालुका अध्यक्ष जगन्नाथ गावडे माजी तालुकाध्यक्ष मालवण गणेश वाईरकर ,सिद्धांत बांदेकर आदी पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

अभिप्राय द्या..