कुडाळ /-
आज कुडाळ शहरातील परप्रांतीय बेकरी व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकावर कुडाळ तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील ईतर व्यापारी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत परप्रांतीय व्यावसायिक यांनां कुडाळ व्यापारी संघटनेने दणका दिला आहे.कुडाळेशोर स्वीट बेकर्स या नावाने सुरू केलेल्या दुकानाला कोणत्याही प्रकारची कुडाळ नगरपंचायत परवानगी घेतलेली नाही,आणि बेकरी व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे लायसन नसल्याने कुडाळ तालुका व्यापारी संघटनेने हा पवित्रा घेतला आहे.
विना लायसन बेकरी व्यवसाय करणाऱ्याना कुडाळ व्यापारी संघटनेने जाब विचारला असता घटनास्थळी कुडाळ शहर MSEB चे अभियंता श्री.पाध्ये साहेब येऊन पाहणी केली,तसेच कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस श्री.रुपेश सारंग, पोलीस संभाजी पाटील घटनास्थळी येत चर्चा व्यापारी संघटनेशी चर्चा केली.यावेळी कुडाळ तालुका व्यापारी संघटना अध्यक्ष श्रीराम शिरसाट यांच्या सोबत नगराध्यक्ष श्री.ओंकार तेली,काँग्रेसचे विधसभा अध्यक्ष मंदार शिरसाट,मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब,नगरसेवक गणेश भोगटे,नगरसेवक सुनील बांदेकर ,युवासेना जिल्हाध्यक्ष मंदार शिरसाट ,ओंकार साळवी,नितेश महाडेशोर,महेश राऊळ, सर्वेश वर्देम,शुक्रा महाडेशोर अन्य उपस्थित होते.