वेंगुर्ले तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी प्रदिप सावंत यांची बिनविरोध तर, सचिवपदी अजित राऊळ यांची निवड

वेंगुर्ले तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी प्रदिप सावंत यांची बिनविरोध तर, सचिवपदी अजित राऊळ यांची निवड

वेंगुर्ले /-

वेंगुर्ले तालुका पत्रकार समितीच्या अध्यक्षपदी प्रदिप सावंत तर सचिव पदी अजित राऊळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.वेंगुर्ले तालुका पत्रकार समितीच्या कार्यकारिणी निवडीसाठी आज मंगळवारी वेंगुर्लेत निरीक्षक हरिश्चंद्र पवार व सुहास देसाई यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.या बैठकीच्या सुरुवातीस वेंगुर्ले तालुका पत्रकार समितीच्या जेष्ठ सदस्या मिराताई जाधव व ज्येष्ठ पत्रकार विजय सामंत यांच्या पत्नी उमा सामंत यांच्या निधनानिमित्त पत्रकार समितीतर्फे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी पुढील प्रमाणे वेंगुर्ले तालुका पत्रकार समितीची कार्यकारिणी निवडण्यात आली.यामध्ये अध्यक्ष प्रदिप सावंत,उपाध्यक्ष के.जी.गावडे, व दाजी नाईक,सचिव अजित राऊळ, सहसचिव विनायक वारंग, खजिनदार एस. एस. धुरी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य दिपेश परब, सल्लागार आपा परब,अनिल निखार्गे, मॅक्सी कार्डोज,कार्यकारिणी सदस्य भरत सातोसकर,अजय गडेकर, प्रथमेश गुरव,सुरज परब,सीमा मराठे,अनिल राणे, योगेश तांडेल, संदेश राऊळ,शंकर घोगळे आदींची निवड करण्यात आली.यावेळी मावळते अध्यक्ष के. जी. गावडे, नुतन अध्यक्ष प्रदिप सावंत,पत्रकार अनिल निखार्गे, एस. एस. धुरी, अनिल राणे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी अनिल निखार्गे यांनी के.जी. गावडे यांनी आपल्या अध्यक्ष कार्यकाळात तसेच कोव्हीड १९ कालावधीतही पत्रकार संघाच्या माध्यमातून चांगले उपक्रम राबविले,असे विचार व्यक्त केले. तर प्रदीप सावंत यांनी बोलताना – यापूर्वी अध्यक्षपद भूषविलेले यांनी चांगले कार्य केले आहे,त्यास अनुसरून सर्वांच्या सहकार्याने – मार्गदर्शनाने पत्रकार संघास आदर्शवत कार्य करणार आहे,असे निवडीनंतर बोलताना विचार व्यक्त केले.स्वागत दाजी नाईक, प्रास्तविक के. जी. गावडे तर आभार सिमा मराठे यांनी मानले.

अभिप्राय द्या..