आयडियल इंग्लिश स्कूल अँड कॉलेज वरवडेच्या विद्यार्थिनींची राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड..

आयडियल इंग्लिश स्कूल अँड कॉलेज वरवडेच्या विद्यार्थिनींची राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड..

कुडाळ /-

महाराष्ट्र राज्य महिला पतंजली समितीच्या वतीने तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये कणकवली वरवडेच्या ज्ञानद्या शिक्षण संस्थेच्या आयडीयल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या आर्या फाटक हिचा 8 ते 12 वयोगटात पहिला व हर्षिता सावंत हिचा 13 ते 20 वयोगटात दुसरा जिल्हास्तरावर नंबर आला आहे. तसेच त्यांची राज्यस्तरीय योगासन स्पर्धासाठी निवड झाली आहे.

कोरोना काळात आयडियल इंग्लिश स्कूलच्या मुलांसाठी योगशिक्षिका सौ.श्वेता गावडे-पळसुले यांचा ऑनलाईन योगवर्ग सुरु असुन त्यांनी या मुलांना बहुमुल्य असे मार्गदर्शन केले. या यशासाठी ज्ञानदा शिक्षण संस्थेचे चेअरमन, सर्व संचालक, पदाधिकारी, प्राध्यापक, मुख्याध्यापिका यांच्याकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. तसेच योगशिक्षिका सौ.श्वेता गावडे-पळसुले यांचे देखील विशेष कौतुक करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..