कुडाळ /-

कुडाळ तालुका काँग्रेस व समादेवी सामाजिक उत्कर्ष संस्थेच्या वतीने कुडाळ येथे मोफत
नेत्र चिकित्सा व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला रुग्णांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. या शिबिरातून ७५ जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. तसेच १५० पेक्षा जास्त लोकांनी या शिबिरात सहभाग दर्शवला.

कुडाळ तालुका काँग्रेस व समादेवी सामाजिक उत्कर्ष संस्थेच्यावतीने मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन डॉ. ए. जी. सवदत्ती व डॉ. रमेश परब यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष ओंकार तेली, काँग्रेसचे पदाधिकारी अभय शिरसाट, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजन नाईक, माजी सभापती राजन जाधव, उद्योजक कौसर खान, पद्मश्री पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे, सुंदर सावंत, महेश परब, डॉ. ए. जी. सवदत्ती, डॉ. रमेश परब, कुडाळ तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर, पल्लवी तारी, विजय प्रभू, विधानसभा मतदार संघाचे युवक अध्यक्ष मंदार शिरसाट, सर्फराज नाईक, सुमेध साळवी, चिन्मय बांदेकर, वैभव आजगावकर आदी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत म्हणाले, जिल्ह्यात एकमेव कुडाळ तालुक्यात सामाजिक उपक्रम वेळी सर्वपक्षीय लोक एकत्र येत पाठिंबा दर्शवतात. हिच खरी कुडाळवासियांची ताकद आहे. यावेळी नगराध्यक्ष ओंकार तेली, डॉ. सवदत्ती, परशुराम गंगावणे यांनी ही शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.
या शिबिराला ग्रामीण भागासह शहरी भागातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. नेत्र आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांनी या शिबिरामध्ये सहभाग घेतला. या ठिकाणी जे रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी लाभार्थी ठरतील त्या रुग्णांची डेरवण रुग्णालयात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page