कुडाळ /-
कुडाळ नगरपंचायतने पुन्हा कोरोनाच्या पाश्वभूमीवर आज दिनांक २ मार्च पासून पुन्हा कोव्हिडं 19 अंतर्गत कुडाळ शहरातील सतरा ही वॉर्ड मद्धे आजपासून निर्जंतुकीकरण ची मोहीम हाती घेतली आहे.आज सर्वप्रथम शहरातील दोन भागात ही मोहीम सुरू केली आहे. ०१ नंबर वॉर्ड कविलकाटे येथील मळेवाडी ,बाळकृष्ण नगर,मधलीवाडी ,बावकर वाडी ,कुंमळ्याचे गाळू याठिकाणी सुरुवात आज सकाळपासून कुडाळ नगरपंचायत कर्मचारी यांनी सुरू केली आहे.तसेच वॉर्ड नंबर ०२ भैरववडी येथे देखील आज सकाळपासून कुडाळ नगरपंचायत कर्मचारी यांनी निर्जंतुकीकरणास सुरवात केली आहे.अशी ही टप्प्या ,,टप्प्याने,, कुडाळ शहरातील सातराही वॉर्ड मद्धे कोरोनाच्या पाश्वभूमीवर कुडाळ शहर निर्जंतुककिकरण केले जाणार ,कुडाळ शहरातील जनतेच्या कोव्हिडं सुरक्षेच्या दृष्टिनातून ही फवारणी केली जात आहे असे कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी सांगितले.