भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या “कायदेशीर सल्लागार” पदी सीए साईप्रसाद कल्याणकर यांची नियुक्ती..

भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या “कायदेशीर सल्लागार” पदी सीए साईप्रसाद कल्याणकर यांची नियुक्ती..

वेंगुर्ला /-

भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आशुतोष त्रिपाठी यांनी सिंधुदुर्गातील बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते व सीए साईप्रसाद कल्याणकर यांची कायदेशीर सल्लागार पदी नियुक्त केल्याची माहिती कोकण विभाग सीईओ राजन रेडकर यांनी दिली.भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष दाजी नाईक व महिला जिल्हाध्यक्ष रिमा मेस्त्री व कोकण विभाग सीईओ राजन रेडकर यांनी साईप्रसाद कल्याणकर यांची मुख्य कार्यालयाने कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्त केल्याचे पत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. सीए साईप्रसाद कल्याणकर हे करीत असलेले सामाजिक कार्य हे भारतीय संविधान व घटनेने दिलेल्या नियमावलीचा वापर करून, शासकीय अधिकारी व सर्वजनसामान्यांनी आपली कर्तव्ये जबाबदारीने पार पाडल्यास कुठल्याच अडचणी येवु शकत नाही. त्यामुळे शासकीय कामातील अनियमिता व गैरव्यवहार होण्याच्या प्रकाराला चाप बसेल व कामात पारदर्शकता येऊन भ्रष्टाचाराला आळा बसेल असे मत राजन रेडकर यांनी व्यक्त करून साईप्रसाद कल्याणकर हे करीत असलेल्या त्यांच्या कार्याबद्दल स्तुती केली.
सीए कल्याणकर हे संविधानिक पद्धतीने करीत असलेल्या सामाजिक कार्याच्या अनुभवाचा फायदा हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी व सदस्यांना उर्जा देणारा असून प्रेरणादायी आहे, असे मत जिल्हाध्यक्ष दाजी नाईक यांनी व्यक्त केले. तसेच सीए कल्याणकर याची नियुक्ती संस्थेचे कायदेशीर सल्लागार केल्याबद्दल महिला जिल्हाध्यक्ष रिमा मेस्त्री यांनी आनंद व्यक्त करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
दरम्यान संस्थेच्या महिला जिल्हाध्यक्ष रिमा मेस्त्री व सदस्य शीला बाळा जाधव ह्या आरवली ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून निवडून आलेल्या असून रिमा मेस्त्री यांनी उपसरपंच पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे. याकरिता संस्थेच्या वतीने त्यांचा सीए साईप्रसाद कल्याणकर,श्रद्धा कल्याणकर व जिल्हाध्यक्ष दाजी नाईक याचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेच्या वतीने येणाऱ्या काळात घटनेने प्राप्त असलेल्या नियमांचा सुयोग्य वापर करून जनसामान्यांना सहकार्य व्हावे, याकरिता कायदेशीर कामे केली जावीत व भ्रष्टाचार होऊ नये याकरिता सतर्क राहून कार्य करण्याची साईप्रसाद कल्याणकर यांनी सर्व उपस्थितांना शपथ दिली. तसेच कायदेशीर सल्लागार या पदाची जबाबदारी देवून नियुक्त केल्याबद्दल संस्थेचे व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. सदर कार्यक्रमास संस्थेचे जगन्नाथ राणे, रविंद्र राणे, बाळा जाधव, सिद्धेश शेलटे, राजाराम उर्फ आबा चिपकर, राजेश सातोसकर, विनय उर्फ बाबू मेस्त्री, नारायण मेस्त्री, वैष्णवी कल्याणकर, ईश्वरी कल्याणकर, सामाजिक कार्यकर्ते अशोक परब व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..