वेंगुर्ला /-

वेंगुर्ला तालुका भाजपा महिला मोर्चा तर्फे महिला दिनानिमित्त शाकाहारी गोड तिखट पाककृती व फ्रुट सॅलड डेकोरेशन व फ्रुट कार्विंग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.सदर स्पर्धा ७ मार्च २०२१ रोजी साईमंगल कार्यालय वेंगुर्ले येथे दुपारी ३ ते ५ या वेळेत घेण्यात येणार आहे. प्रथम, व्दितिय, तृतीय क्रमांकाला रोख रक्कम पारितोषिक म्हणून दिली जाईल.
तसेच ८ मार्च रोजी दुपारी ३ ते ९ या वेळेत महिलांसाठी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आणि फनी गेम्स आयोजित करण्यात आले आहेत. महिलांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाचा आनंद लुटावा व शोभा वाढवावी,तसेच कार्यक्रम स्थळी येताना मास्क वापरणे अत्यावश्यक आहे, असे आवाहन महिला मोर्चाच्या पदाधिकारी सुषमा प्रभू खानोलकर,(९४०४१६३५७४) वृंदा गंवडळकर व स्मिता दामले यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page