शिरंगे येथील काळ्या दगडाच्या खाणीत पोलिसांनी केला कसून तपास

शिरंगे येथील काळ्या दगडाच्या खाणीत पोलिसांनी केला कसून तपास

धरणालगतच असलेल्या खाणी नक्की कुणाच्या आशीर्वादाने..

दोडामार्ग /-

शिरंगे येथील धरणाच्या अगदी लगतच शासन नियम तुडवत काळ्या दगडाच्या खाणी सुरू असून जिलेटिन सारखे स्फोट होत अनेक धक्कादायक प्रकार समोर येताना दिसत आहेत, याला आळा घालणे अतिशय आवश्यक आहे परंतु याकडे मात्र सतत दुर्लक्ष होत असून अशीच एक थरारक घटना घडली असता,
रविवारी झालेल्या जिलेटीन स्फोटात दोन परप्रांतीय कामगार जखमी झालेले होते हे परप्रांतीय कामगार शिरंगे येथील काळ्या दगडाच्या खाणीत काम करत होते, परंतु ते जखमी अवस्थेत मात्र मनेरी येथील मुख्य रस्त्याच्या बाजूला आढळले व हे परप्रांतीय कामगार शिरंगे येथिल काळ्या दगडाच्या खाणीत काम करत असल्याचे उघडकीस आल्याने दोडामार्ग पोलिसांनी शिरंगे येथील काळ्या दगडाच्या खाणीत जात कसून तपासणी केली असता मात्र जखमी झालेल्या कामगारांच्या नातेवाईकांकडून व इतर कामगारांन कडून टाळाटाळ केलेली दिसून आली असता यावेळी मात्र शिरंगे येथील धरणाच्या अगदी लगतच असलेल्या काळ्या दगडाच्या खाणीत जात पोलिसांनी कसून तपासणी केली.
जखमी झालेले परप्रांतीय कामगार हे शिरंगे येतील धरणापासून अगदी लगतच असलेल्या काळ्या दगडाच्या खाणीत काम करत असल्याने स्फोटक पदार्थ हा त्या खाणीतुनच आणला असावा अशी शक्यता देखील नाकारता येत नाही.

अभिप्राय द्या..