कुडाळ /-
खिडकीची ग्रिल उचकटून आत प्रवेश करून कुडाळ एमआयडीसी येथील स्वराज्य कँश्यू इंडस्ट्रीजमध्ये काजू गरासह सुमारे ९३ हजाराचे साहित्य चोरीस गेले.
यातील सौ कविता विलास उपाध्ये यांची कुडाळ एमआयडीसी येथे स्वराज्य कँशू इंडस्ट्रीज नावाची काजूवर प्रक्रिया करणारी कंपनी आहे. ही कंपनी मँनेजर भूषण सुभाष नेमण रा नेरूर रावलेवाडी हे रोज रात्री ७.३० वा ही कंपनी बंद करतात व रोज सकाळी ७.३० वा उघडतात. नेहमी प्रमाणे ते २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वा कंपनी बंद करून गेले होते. यानंतर शनिवारी सकाळी ७.३० वा आल्यावर मुख्य शटरच्या बाजुची ग्रील उचकटलेली आढळली. त्यामुळे त्यांनी त्वरीत श्रीम. उपाध्ये यांना फोन करून या घटनेची माहिती दिली. यानंतर श्रीम उपाध्ये या त्याठिकाणी येत मुख्य शटर उघडून आत प्रवेश केला यावेळी १०० किलो बिनसोललेले ३० हजाराचे काजू गर, ४० हजाराचे ११० किलो सोललेले काजू गर, ४ हजाराचे ४० किलो, बॉक्समध्ये ठेवलेली १० हजाराचे काजूगर, ४ हजाराची वेल्डिंग मशीन, ५०० रू ची ग्रिडींग मशीन, असा ९३ हजाराचा मुद्देमाल चोरीस गेला. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर श्वान पथक तसेच ठसे तज्ञ यांना पाचारण करून चोरट्यांचा माघ काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेनंतर सावंतवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीम डाॅ रोहिणी सोळंके , कुडाळ पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेची फिर्याद कुडाळ पोलिसात सौ कविता विलास उपाध्ये यांनी दिली आहे.