मालवण येथील भंडारी ए.सो.हायस्कूल मध्ये मराठी राजभाषा दिन साजरा..

मालवण येथील भंडारी ए.सो.हायस्कूल मध्ये मराठी राजभाषा दिन साजरा..

मालवण /-

वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांनी आधुनिक मराठी कवितेला व नाट्याला नवे वलय देण्याचे कार्य केले. त्यांच्याच मराठी साहित्यातून त्यांचे मराठीवर असलेले जाज्वल्य प्रेम आणि मराठी भाषेच्या विकास व संवर्धनाबाबत असलेली तळमळ दिसून येते. मायबोली ही आपल्या जन्मभूमीकडून आणि आपल्या आईकडून मिळालेली भाषा असते. मराठी ही आपली मायबोली असून ती सुंदर आहे आणि म्हणूनच मराठीतून शिक्षण घेताना दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा वापर करणे अनिवार्य आहे, असे प्रतिपादन मालवणचे सुपुत्र , साहित्यिक आणि प्रकाशक श्री चंद्रकांत पारकर यांनी भंडारी हायस्कूल मालवण येथे बोलताना केले.

मालवण येथील भंडारी ए.सो.हायस्कूल मध्ये मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे साहित्यिक चंद्रकांत पारकर हे बोलत होते. कार्यक्रमाचे उदघाटन चंद्रकांत पारकर यांच्या हस्ते द्वीपप्रज्वलन व कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक व्ही.जी.खोत, पर्यवेक्षक एच. बी. तिवले, सौ. चैताली पारकर,सहाय्यक शिक्षिका संजना सारंग, सुनंदा वराडकर, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई आदी उपस्थित होते प्रारंभी प्रफुल्ल देसाई यांनी प्रास्ताविक तर तिवले यांनी उपस्थितांचे स्वागत केले यावेळी चंद्रकांत पारकर यांचा प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक श्री. खोत यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी चंद्रकांत पारकर यांनी मराठी भाषा ही आपली मायबोली असून ती सुंदर अशी भाषा आहे. आज इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये जे काही शिकविले जाते ते केवळ वरवरचे आणि पाठांतर करून परीक्षेला लिहिण्यापुरते असते. मात्र मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये मुलांना जे शिक्षण दिले जाते त्याचा अर्थ मुलांना सहजपणे समजतो, कारण ते खोलपर्यंत दिलेले शिक्षण असते,
मायबोली मराठी असूनही आजकाल इंग्रजी येत असल्याचे दाखविण्यासाठी काही इंग्रजी शब्दांचा मराठी बोलताना सर्रास वापर केला जातो ते होता कामा नये याची दक्षता आपण घेतली पाहिजे असे ते म्हणाले यावेळी श्री खोत यांचे समयोचित भाषण झाले

यावेळी विविध स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.तसेच मोगरा या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कलाशिक्षक अरविंद जाधव, सौ मेस्त्री,सौ ए ए वाइरकर, उन्नती चव्हाण, मिताली मयेकर, उत्कर्षा चिपकर, नितल मालंडकर, स्नेहल मोंडकर, अनिकेत गावकर यांनी अथक परिश्रम घेतले . कोरोना विषयक नियम पाळून सोशल डिस्टन्स राखून मास्क लावून हा कार्यक्रम पार पडला.

अभिप्राय द्या..