उच्च आणि तंञशिक्षण विभागाच्या परिक्षा ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने होणार.;पालकमंत्री उदय सामंत

उच्च आणि तंञशिक्षण विभागाच्या परिक्षा ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने होणार.;पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्ग /-

उच्च आणि तंञशिक्षण विभागाच्या परिक्षा ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने होणार असे उच्च आणि तंञशिक्षण मंञी उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.उच्च आणि तंञशिक्षणाच्या परीक्षाचा निर्णय प्रत्येक विद्यापीठाने घेतलेला आहे ऑफ लाईन आणि ऑनलाईन परीक्षा होणार आहेत माञ त्या ऐच्छिक ठेवलेल्या आहेत विद्यार्थ्यांना जसं शक्य असेल ऑफलाईन द्यायची की ऑनलाईन हे त्यांच्या मर्जीवर सोडलेलं आहे आणि तसा निर्णय सर्व कुलगुरूनी घेतलेला आहे.इंजिनिअरींग आणि पाॅलीटेक्नीक सेमिस्टरच्या परीक्षा शंभर टक्के ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..