वेंगुर्ला /-

वेंगुर्ले तालुक्यात आज शुक्रवारी १९ फेब्रुवारी २०२१ रोजी शिवजयंती उत्सव उत्साहात व साधेपणाने साजरा करण्यात आला.यावर्षी कोव्हीड १९ च्या पार्श्वभूमीवर शिवजयंती अत्यंत साधेपणाने शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन साजरी करण्यात आली.वेंगुर्ले नगरपरिषदमध्ये उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ यांच्या हस्ते शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी करण्यात आली.यावेळी नगरसेविका श्रेया मयेकर, कृतिका कुबल, शितल आंगचेकर, साक्षी पेडणेकर, पूनम जाधव, सुहास गवंडळकर, आत्माराम सोकटे, मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल व न. प. कर्मचारी उपस्थित होते.सकल मराठा समाज वेंगुर्ला तालुक्याच्या वतीने वेंगुर्ले माणिकचौक येथे शिवजयंती साजरी करण्यात आली.
यावेळी तालुका अध्यक्ष व उपसभापती सिध्देश परब,महिला अध्यक्षा प्रज्ञा परब,खजिनदार सखाराम ठाकुर, तालुका समन्वयक मठ सरपंच तुळशीदास ठाकुर, पराग सावंत, अस्मिता राऊळ, कृतिका कुबल, शितल आंगचेकर, साहस प्रतिष्ठान अध्यक्षा रुपाली पाटील,तुळस अध्यक्ष मिलिंद शेटकर, तालुका समन्वयक सुनिल नाईक, सत्यवान पालव , अक्षय सावंत, निरज सावंत , शहरातील महिला समन्वयक तसेच वेंगुर्ले तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते.
शिवप्रेमी मित्रमंडळ माणिक चौक तर्फे माणिकचौक येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी नितीश कुडतरकर, रोहित वेंगुर्लेकर, विकास शिनगारे, सागर वैद्य, प्रसाद बागायतकर, सुयोग चेंदवणकर, प्रथमेश यंदे, वेदांत पेडणेकर, दिप वेंगुर्लेकर, कृणाल मोर्ये, कृणाल बांदेकर, गणेश अणसुरकर, निलय नाईक, आदी उपस्थित होते.

ग्रामपंचायत तुळस व
सकल मराठा समाज तुळस अशी आदीं दोन्हीनी शिवप्रतिमा पूजन करून शिवजयंती साजरी केली.उपसरपंच सुशील परब
ग्रा.पं. सदस्य जयवंत तुळसकर,
शीतल नाईक, शेखर तुळसकर, सुशील परब,
तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप परब,
संजय परब,मंदार तुळसकर,यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत तुळस येथे शिवजयंती साजरी करण्यात आली.तसेच तालुक्यात अन्य ठिकाणी कोरोना कोरोना नियम पाळून शिवजयंती उत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page