वेंगुर्ला /-
बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर काॅलेज वेंगुर्ले,महिला विकास कक्ष,श्रीमती सुशीलादेवी मल्हारराव देसाई युवती सचेतना फाउंडेशन, गोपाळ कृष्ण गोखले काॅलेज, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमती सुशीलादेवी मल्हारराव देसाई यांच्या स्मरणार्थ बॅ.खर्डेकर काॅलेजमध्ये विद्यार्थ्यीनींसाठी प्रबोधनात्मक व्याख्यान संपन्न झाले.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ.धनश्री पाटील यांनी केले व त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे फुलझाडे देऊन स्वागत करण्यात आले. डाॅ. पद्मश्री आवटे यांनी शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर च्या प्रशासन अधिकारी प्रा.डॉ.मंजिरी देसाई -मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या युवती सचेतना फाऊंडेशनच्या उद्दिष्ट्यांवर प्रकाश टाकला. सॅकाॅनच्या ज्येष्ठ संशोधन जीवशास्त्रज्ञ कुमा. धनुषा कावलकर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या होत्या. त्यांनी “केव्ह्स – अंडरएक्सप्लोअर्ड पॅराडाइस” या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी “गुहा, त्यांचे प्रकार, त्यातील विभागणी, इंडीयन स्वीफ्टलेट – एडीबल नेस्ट स्वीफ्टलेट पक्षी व काम करताना आलेले अनुभव” याबद्दल विद्यार्थीनींना प्रेझेंटेशनद्वारे मार्गदर्शन केले. त्यानंतर डाॅ. सुप्रिया राऊळ यांनी अध्यक्षीय भाषणाद्वारे विद्यार्थीनींना संबोधित केले. यावेळी गोखले काॅलेजच्या प्राध्या. तेजस्विनी पाटील तसेच बॅ. खर्डेकर काॅलेजच्या सर्व प्राध्यापिका व विद्यार्थीनी वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थीनींना पर्यावरण शिक्षणातून उपलब्ध संधीची ओळख झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी परब व करिष्मा मोहिते तर आभार प्रदर्शन प्रा.वीणा दीक्षित यांनी केले. कार्यक्रमास प्रितीश लाड, नितीन कवठणकर, हिरोजी परब या स्वयंसेवकांचा हातभार लागला. कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडण्यात खर्डेकर काॅलेजचे प्राचार्य डाॅ. विलास देऊलकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.