८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त ओरोस येथे जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धेचे आयोजन..

८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त ओरोस येथे जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धेचे आयोजन..

कुडाळ /-

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जय भवानी फुगडी ग्रुप यांच्यातर्फे जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ८ मार्च रोजी इच्छापूर्ती मंगल कार्यालय ओरोस येथे आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २५ फेब्रुवारीपर्यंत नावनोंदणी करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५५०१ रुपये व आकर्षक चषक तसेच प्रमाणपत्र, द्वितीय पारितोषिक ३३०१ रुपये व आकर्षक चषक तसेच प्रमाणपत्र, तृतीय पारितोषिक २२०१ रुपये व आकर्षक चषक तसेच प्रमाणपत्र अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहे. तरी इच्छुक संघानी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्पर्धेसाठी प्रवेश फी १ हजार रुपये ठेवण्यात आली आहे. सहभागी प्रत्येक फुगडी संघास मानधन ११०० रुपये राहिल. फुगडी सादरीकरण वेळ निवेदनासह २५ मिनिटे आहे. या स्पर्धेच्या पूर्वी किमान अर्धा तास संघाने उपस्थित राहावे. तसेच प्रथम नोंदनी केलेल्या पहिल्या १० संघानाच प्रवेश दिला जाईल. फुगडी ही दैनंदिन व पारंपारिक असावी. फुगडी घालताना रेकॉर्ड केलेल्या गाण्यांचा, किंवा गाण्याच्या रेकॉर्डचा वापर करू नये. तसेच एका संघात कमीत कमी ८ व्यक्ती व जास्तीत जास्त १५ व्यक्ती असाव्यात (गायक व वादकासह) अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी सौ. वीणा पाडाळकर , सौ. संजना राणे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..