शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त हिमानी परबचा बांदिवडेत सत्कार..

मसुरे /-

राज्य शासनाचा मानाचा असा शिवछत्रपती पुरस्कार मिळविणारी हिमानी उत्तम परब हिचे मूळ गाव बांदिवडे आहे ही आपणा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. मल्लखांब या क्रीडा प्रकारामध्ये जगभरात नावलौकिक मिळवून देशाचे पर्यायाने राज्याचे व आपल्या गावाचे नाव रोशन करावे अशा शब्दात ज्ञानसागर विद्यालय मुंबई येथील शिक्षक व बांदिवडे गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते सोनु सुधाकर सावंत यानी शुभेच्छा दिल्या.
बांदिवडे येथील पावणाई भगवती मंदिर येथे हिमानी परब हिचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
वयाच्या पाचव्या वर्षापासून हिमानी परब श्री समर्थ व्यायाम शाळेत नियमितपणे मल्लखांबाचा सराव करत आहे. आतापर्यंत तिने जिल्हा ,महाराष्ट्र राज्य ,व देशात वेगवेगळ्या प्रकारचे स्पर्धा खेळत अनेक सुवर्णपदके मिळवली आहेत. तसेच २०१८-१९ मध्ये तिने जागतिक मल्लखांब स्पर्धा खेळून चार सुवर्णपदक व दोन ब्राँझ पदके मिळवली आहेत. तसेच त्या स्पर्धेमध्ये तिने भारताचे कप्तानपद ही भूषविले होते.या कामगिरीबद्दल तिला महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिव छत्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
तसेच मुंबई जिल्हा गुणवंत महिला खेळाडू पुरस्कार ही तिला प्राप्त झाला असल्याची माहिती सावंत यांनी दिली.
यावेळी गावातील
दानशुर व्यक्तीमत्व अविनाश परब, आरोग्य सेवक राहुल काळे, आरोग्य सेविका सौ पी. एल. चव्हाण, मालवण पत्रकार संघाचा पुरस्कार प्राप्त दै. प्रहारचे पत्रकार झुंजार पेडणेकर, बांदिवडे तर होडी नावाडी कै. रहिमान सयैैद यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी सोनु सावंत, श्वास चित्रपटाचे निर्माते मोहन परब, अरुण भट, आप्पा गोविंद परब, अविनाश परब, चंद्रकांत प्रभु, मधुकर परब, प्रकाश परब, दिनेश परब, सुभाष परब, शामसुंदर परब, उत्तम परब, साईप्रसाद प्रभु, सतिश बांदिवडेकर, प्रफुल्ल प्रभु, रंजन प्रभु, सौ निशा परब, प्रमोद परब, अरविंद परब,के. के. सावंत, उत्तम परब, बलदेव प्रभु, प्रशांत परब, राजेंद्र परब, शाम परब, शंकर आईर, चारुदत्त परब, विष्णु परब, शाहीद सयैद, अमित परब उपस्थित होते. सुत्रसंचलन विश्वनाथ परब तर आभार आनंद परब यांनी मानले.
फोटो: बांदिवडे पावणाई मंदिर येथे शिवछत्रपती पुरस्कार मिळविणारी हिमानी परब हीच सत्कार करताना श्वास चित्रपटाचे निर्माते मोहन परब बाजूला सोनू सावंत, आपा परब व अन्य मान्यवर
छाया: दत्तप्रसाद पेडणेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page