श्री..राम मंदिर निधी समर्पण अभियान देवगड मध्ये सुरू..

श्री..राम मंदिर निधी समर्पण अभियान देवगड मध्ये सुरू..

देवगड /-

अयोध्या येथे श्रीराम मंदिर उभारण्यासाठी श्रीराम मंदिर निधी समर्पन अभियान देवगड तालुक्यामध्ये सुरु झाले असून या पाश्र्वभुमीवरती शुक्रवारी हडपीड स्वामी समर्थ मठ येथून या रथाची सुरुवात होवून दिवसभर हा रथ तालुक्यामध्ये विविध ठिकाणी वाजत गाजत \िरविण्यात आला व या रथाचे स्वागतही गावागावामध्ये मोठया प्रमाणात करण्यात आले. राम जन्मभुमी तिर्थक्षेत्र न्यास अयोध्या येथील हा रथ देवगड तालुक्यातील शुक्रवारी सकाळी ९.३० वा. हडपीड स्वामी समर्थ मंगल कार्यालयामध्ये आगमण झाले या रथाचे देवगड तालुक्याच्यावतीने भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले.तेथून शिरगांव,qलगडाळ तिठा,तळेबाजार व दुपारी १२ वा देवगड येथे बर्वे लायब्ररीच्या पटांगणामध्ये आगमन झाले. तेथून देवगड बाजारपेठ,किल्ला हनुमान मंदिर,आनंदवाडी श्रीराम मंदिरामध्ये पर्यंत जल्लोषी स्वागत या रथाचे करण्यात आले.

अभिप्राय द्या..