पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात वेंगुर्ला येथे शिवसेनेचे आंदोलन..

पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात वेंगुर्ला येथे शिवसेनेचे आंदोलन..

वेंगुर्ला/-

पेट्रोल डिझेल दरवाढ कमी करा- नाहीतर खुर्च्या खाली करा,केंद्र सरकारचा निषेध असो,पेट्रोल डिझेल दरवाढ कमी झालीच पाहिजे,अशा घोषणा देत
पेट्रोल – डिझेलच्या दरवाढी विरोधात – केंद्र शासनाच्या विरोधात वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या वतीने आज वेंगुर्ले तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी केंद्र सरकारने वाढविलेल्या पेट्रोल – डिझेल चे दर कमी करण्याच्या मागणी संदर्भाचे निवेदन वेंगुर्ले तहसीलदार प्रविण लोकरे यांना देण्यात आले.संपूर्ण देशात कोरोना संकटामुळे अनेकांचे रोजगार बुडाले,अनेक लोकांचे संसार उध्वस्त झाले,या चिंतेत सर्वसामान्य माणूस असताना सतत वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीस आला आहे.त्यात पेट्रोल डिझेल कोणत्याही क्षणी शंभरी गाठेल,या इंधनवाढीच्या निषेधार्थ आज तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेना शाखा – वेंगुर्ले बाजारपेठ – हॉस्पिटल नाकामार्गे – तहसीलदार कार्यालय पर्यंत घोषणा देत मोर्चा काढण्यात आला.यावेळी निवेदनाद्वारे पेट्रोल डिझेलची होत असलेली दरवाढ रोखून देशातील नागरिकांच्या खिशाला परवडेल एवढा पेट्रोल डिझेलचा दर निश्चित करावा,अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी या आंदोलनात शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब,उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे व आबा कोंडसकर,शहरप्रमुख अजित राऊळ, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, नगरसेवक तुषार सापळे,महिला तालुका संघटक सुकन्या नरसुले,शहर संघटक मंजुषा आरोलकर,विवेकानंद आरोलकर,प्रकाश गडेकर, निलेश चमणकर,पं. स.सदस्य तथा माजी सभापती सुनिल मोरजकर,शामसुंदर पेडणेकर,
हेमंत मलबारी, तालुका युवासेना अधिकारी पंकज शिरसाट,विलास चिपकर,सुमन कामत,शशिकांत परब,गजानन गोलतकर,समृद्धी कुडव,रश्मी डीचोलकर,अनन्या धावडे,नम्रता बोवलेकर,सायली गावडे,मेरी फर्नांडीस, सुभाष मळकर, उमेश नाईक,सुनिल वालावलकर,आनंद बटा,शैलेश परुळेकर,दिलीप राणे,मितेश परब,नित्यानंद शेणई,शैलेश परुळेकर, दिलीप राणे,छोटू कुबल,बाळा पेडणेकर,दिगंबर पेडणेकर,अशोक नाईक,सुयोग चेंदवणकर,मितेश परब,वेदांग पेडणेकर, वैभव फटजी,प्रसाद आचरेकर, मंगेश तांडेल,सुधीर पालकर,मनोहर येरम,श्रीकांत घाटे,नरेंद्र मोंडकर,ज्ञानदेव चोपडेकर, संतोष कुडव,ज्ञानेश्वर वस्त,अनंत मांजरेकर, किशोर परब,मदन गावडे,राजेश गावडे,गौतम मुळे, अशोक नाईक आदींसह तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी,शिवसैनिक,कार्यकर्ते उपस्थित होते.

अभिप्राय द्या..