इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानची त्रैवार्षिक डाळपस्वारी २५फेब्रूवारी पासून २५ फेब्रुवारी ते २ मार्च पर्यंत आयोजन..

इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानची त्रैवार्षिक डाळपस्वारी २५फेब्रूवारी पासून २५ फेब्रुवारी ते २ मार्च पर्यंत आयोजन..

आचरा /-

अवघ्या आचरा वासीयांमध्ये उत्साह निर्माण करणारया
आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानची डाळपस्वारीची तारीख जाहीर झाली असून २५ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत होणार आहे. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सुरक्षेच्या उपाययोजना राबवत डाळपस्वारी होणार असल्याचे मानकरी शंकर मिराशी यांनी सांगितले आहे.

मालवण तालुक्यातील जागृत आणि प्राचिन शीवस्थानामुळे इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानची महती सर्वदूर पसरली आहे.येथील सण उत्सव संस्थानी थाटात साजरे होत असतात.अशाच प्रकारे दर तीन वर्षांनी होणारी डाळपस्वारी या वर्षी श्रींच्या कौल प्रसादाने २५फेब्रूवारी ते दोन मार्च या कालावधीत संपन्न होणार आहे.
अत्यंत शाही थाटात संपन्न होणाऱ्या या डाळपस्वारीस गुरुवारी२५फेब्रूवारीपासून सुरुवात होणार असून बुधवारी २४रोजी सायंकाळी पुर्वस आणला जाणार आहे. गुरुवारी २५रोजी सकाळी रामेश्वर मंदिर येथून श्रींची स्वारी डाळपस्वारी ला बाहेर पडणार आहे.आचरा बाजारपेठ फुरसाई मंदिर येथील डाळप करून पाठांतरी ब्राम्हण, मिराशी वाडी मार्गे सायंकाळी नागझरी गिरावळ (पुर्वी आकारी) मंदिर येथे विसावणार आहे.शुक्रवार २६रोजी दुपारी गिरावळ मंदिर येथे रास पोटाळून भंडारवाडी, बौद्धवाडी येथील स्थळ येथून सायंकाळी उशिरापर्यंत गाऊडवाडी ब्राम्हणदेव मंदिर येथे मुक्कामाला थांबणार आहेत. शनिवारी २७रोजी सकाळी गाउडवाडी येथून पांगेवाडी मंडप जामडूल,पिरावाडी चव्हाटा मार्गे हिर्लेवाडी ब्राम्हणदेव मंदिरास भेट देऊन पहाटे पुन्हा गिरावळ मंदिराकडे येणार आहेत. येथे रविवार, सोमवारी विश्रांती नंतर मंगळवारी २मार्च रोजी गिरावळ मंदिर येथून आचरा बाजारपेठ मार्गे नागोचीवाडी ब्राम्हणदेव ,पारवाडी ब्राम्हणदेव मंदिर येथून रामेश्वर भेटीनंतर गांगेश्वर मंदिरा कडे स्थिरावणार आहे.
गुरुवारी सायंकाळी झालेल्या बारा पाच मानकरी, देवसेवक यांच्या बैठकीनंतर डाळपस्वारीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.
डाळपस्वारीचा कार्यक्रम जाहीर झाल्या नंतर संपूर्ण आचरे गावात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून श्रींच्या स्वारीच्या स्वागतासाठी वाडीवाडीवरील मंडळातर्फे नियोजनासाठी बैठकांचे आयोजन केले जात आहे.

अभिप्राय द्या..