आमदार कपिल पाटील यांनी व्हीसी द्वारे केली शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची मागणी ..
सिंधुदुर्ग /-
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गचे शिष्टमंडळाने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर यांच्या दालनात
आंतरजिल्हा बदली कार्यमुक्ति बाबत चर्चा केली.
याबाबत सीईओ सिंधुदुर्ग यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्त पदाबाबत वेळोवेळी शासनास देण्यात माहिती सांगितली. यावर जिल्हाध्यक्ष श्री संतोष पाताडे, राज्य उपाध्यक्ष श्री दयानंद नाईक यांनी मुख्याध्यापक जागा,2018-19 व 2019-20 ची संचमान्यता शून्य पटसंख्ये अभावी बंद झालेल्या शाळा व त्यामुळे अतिरिक्त ठरलेले शिक्षक, सेवा निवृत्ती मुख्यध्यापकांमुळे रिक्त झालेल्या जागा व शिक्षक भरती मधील विसंगती याकडे लक्ष वेधले व शिक्षकांना कार्य मुक्त करण्याची मागणी केली.
आंतरजिल्हा बदली टप्पा क्रमांक ५ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश होणेबाबत
याबाबत मान. आमदार कपिल पाटील यांनी सांगितले की, सध्या नोकर भरतीवर बंदी आहे. सिंधुदुर्ग रिक्त जागा असल्यामुळे आंतरजिल्हा बदली मध्ये निर्माण झालेल्या अडचणीचा अहवाल सीईओ यांच्या वतीने उपसंचालक, संचालक व ग्रामविकास विभाग यांना त्वरित पाठवावा. मी स्वतः संचालक व ग्रामविकास विभाग यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले.
तसेच प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग चे शिष्टमंडळ अंतर जिल्हा बदली प्रतिनिधी मान. आमदार कपिल पाटील यांच्यासमवेत मंगळवार दिनांक ९ फेब्रुवारी रोजी ग्रामविकास मंत्री मान.हसन मुश्रीफजी व ग्रामविकास सचिव यांची भेट घेणार आहेत. अशी माहिती अध्यक्ष संतोष पाताडे यांनी दिली.
DCPS हिशोब तक्त्यातील तफावती दुरुस्त केल्या जातील.तसेच 2005 पूर्वी सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांची 10 महिन्याची अंशदान कपात रक्कम व 6 व्या वेतन आयोगाच्या फरकाचा 1 व 2 रा हप्ता अद्यापही प्रो.फंड खात्यात जमा नाही. तसेच सहाव्या वेतन आयोगाचा 3 रा व 4 था हप्ता आठ वर्षे झाली तरी DCPS तसेच प्रो. फंड खात्यात जमा नाही. याबाबत सतत चार वर्षे पाठपुरावा करूनही कार्यवाही न झाल्याबाबत संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली.याबाबत मान. सीईओ यांनी शिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा करून वस्तुस्थिती जाणून घेतली व DCPS कपात रक्कम,वेतन आयोगाचे सर्व हप्ते भविष्य निर्वाहनिधीत एप्रिल पर्यंत जमा रक्कम केली जाईल असे आश्वासन मा.मुख्यकार्यकारी अधिकार यांनी बैठकीत दिले.
सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावेळी शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर,उपशिक्षणाधिकारी नाईक मॅडम, कक्ष अधिक्षक विनायक पिंगुळकर व श्री डोईफोडे तसेच संघटनेच्या शिष्टमंडळात दया नाईक राज्य (उपाध्यक्ष),संतोष पाताडे (जिल्हाध्यक्ष) ,श्री.अरुण पवार (सरचिटणीस), वेंगुर्ला तालुका अध्यक्ष वसंत गर्कल , मालवण तालुका अध्यक्ष संतोष कोचरेकर, देवगड तालुका अध्यक्ष विनायक कांबळे, शिक्षक प्रतिनिधी ईश्वर थडके. महिला प्रतिनिधी जयश्री दोडके व लोकडे मॅडम उपस्थित होते.