वेंगुर्ला तालुक्यात ठाकरे सरकारच्या विरोधात घंटानाद.

वेंगुर्ला तालुक्यात ठाकरे सरकारच्या विरोधात घंटानाद.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली देवस्थाने सुरु करण्यासाठी केंद्र सरकारने नियमावलींसह परिपत्रक जारी करुनही राज्य सरकारने महाराष्ट्रातील बरीच मंदिर उघडण्यासाठी परवानगी दिली नाही. त्यामुळे आज वेंगुर्ला भाजपाच्या वतीने आणि भाविक, जनता, धार्मिक-अध्यात्मिक संस्था, संघटना, देवस्थानचे मानकरी,विविध सांप्रदायाचे मान्यवर यांच्या सहकार्याने येथील ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरासमोर आघाडी सरकारच्या विरोधात घंटानाद करण्यात आला.या घंटानाद दरम्यान विविध घोषणा देण्यात आल्या.

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप,नगरसेवक प्रशांत आपटे, नागेश गावडे, धर्मराज कांबळी,श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्टचे रविद्र परब,विष्णू परब,जगदीश परब,बाळा परब,नितेश परब,स्वप्निल परब,मंगेश परब,प्रसाद परब,मानकरी सुनिल परब, शिवराम परब, देवस्थान पूजारी विजय गुरव यांच्यासह भाजपाचे समिर चिदरकर, राहूल मोर्डेकर, निलय नाईक,भगवान नाईक,आनंद गावडे, बाळकृष्ण मयेकर,ओंकार चव्हाण,शरद मेस्त्री,विनोद लोणे,शेखर काणेकर, निखिल घोटगे, माजी उपनगराध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते. घंटानाद झाल्यानंतर वेंगुर्ला तहसिलदार यांना निवदेन देण्यात आले. राज्यातील जनतेची श्रद्धास्थाने असलेली सर्व मंदिर कोविड नियमावलीच्या अटी शर्थीसह त्वरित खुली करण्यासाठीची आमची असलेली मागणी राज्य सरकारपर्यंत पोहचवावी, असे या निवेदनात नमूद केले आहे. वेंगुर्ला शहराबरोबरच तुळस, म्हापण, वायंगणी, रेडी येथीलही ग्रामदेवतेच्या मंदिरांसमोर ठाकरे सरकारच्या विरोधात घंटनाद करण्यात आला. यावेळी त्या त्या मंदिरांचे मानकरी, पूजारी, भाविक यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

अभिप्राय द्या..