मसुरे /-
देवगड तालुक्यातील मुणगे लब्देवाडी येथे दिशा दर्शक नामफलकांचे उदघाटन नुकतेच करण्यात आले.
लब्देवाडी विकास मंडळ मुंबई यांच्या सौजन्याने
दिवंगत माजी सदस्य श्री भगवान अर्जुन माळकर यांच्या सूचनेनुसार आडवळ वाडी समुद्र किनाऱ्यावर जाणाऱ्या मुख्य मार्गावर दिशा दर्शक फलकांचे बांधकाम लब्देवाडी ते भंडार वाडीच्या सुरवाती पर्यंत तीन ठिकाणी करण्यात आले आहे.
फलकांचे अनावरण वाडीतील जेष्ठ नागरिक श्री रघुनाथ पुजारे, शंकर नाटेकर, जयवंत सावंत ,मोहन साटम ,अरुण लब्दे, सदानंद नाटेकर यांच्या हस्ते झाले.
मुणगे येथील श्री देवदत्त पुजारे, योगेश लब्दे,
उदय लब्दे यांच्या कल्पनेतून व श्री नितिन कारेकर यांच्या कलाकुंचल्यातून हे दिशा दर्शक फलक रंगविण्यात आले आहेत.
यावेळी मुंबई मंडळ अध्यक्ष – श्री रत्नदीप पुजारे, सचिव श्री मंगेश तावडे, सदस्य – उत्तम लब्दे, प्रमोद मुरकर, नितीन माळकर, उल्हास लब्दे, विलास तावडे, मोहन पुजारे, मिलन तावडे, प्रदिप माळकर, अक्षय पुजारे, शितलकुमार लब्दे, विकास तावडे, तसेच
लब्दे वाडी विकास मंडळ मुणगेचे अध्यक्ष प्रकाश लब्दे, सचिव संजय लब्दे,
सदस्य प्रवीण ठुकरुल , मंगेश हाटले, अरुण मुरकर, दीपक पुजारे तसेच मंडळाचे पदाधिकारी,सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.