मुणगे श्री भगवती देवालय परिसरात स्वच्छता अभियान!

मुणगे श्री भगवती देवालय परिसरात स्वच्छता अभियान!

मसुरे /-

देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती देवीचा वार्षिक जत्रोत्सव शासनाच्या कोरोना बाबत सर्व नियम पाळत नुकताच संपन्न झाला. यात्रा कालावधीत देवालय परिसरालगत निर्माण झालेला कचरा ग्रामस्थांनी स्वच्छता अभियान राबवत साफ केला. यावेळी आशिष आईर, निलेश हिर्लेकर, राजू बोरकर, दादा वळंजू, शेखर गुरव, संदीप परब, सुनील हिर्लेकर , पिंटू परब, भाऊ, मनवा वळंजू, चिन्मय परब, गोरख वळंजू, निखिल हिर्लेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

अभिप्राय द्या..