कुडाळ/-
कुडाळ पंचायत समितीच्या प्रत्येक बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित राहात नाहीत त्या विभागाकडुन बैठकीसाठी पाठवण्यात येत असलेल्या कर्मचाऱ्यांकडुन समाधान कारक माहीती मिळत नसल्याने यापुढे संबधित विभागाच्या वरिष्ठ कार्यालयात एकत्रितपणे जावुन जाब विचारण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या पंचायत समितीच्या बैठकीत घेण्यात आला कुडाळ पंचायत सामितीची बॅठक आज पंचायत समितीच्या छत्रपती संभाजीराजे सभागृहात सभापती नुतन आई र यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठकीस उपसभापती डाय भारत पालव सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई यांच्यासह प .स. सदस्य खाते प्रमुख उपस्थित होते सुरवातीस पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या अभिनंदनाचा ठराव राजन जाधव यानी मांडला तालुक्यातील सर्वच रस्यावर जीवघेणे २वडे पडले आहेत एकाही रस्तावरून वाहन चालवणे भयानक झालेले आहे खड्डे बुजवण्याचे काम काही ठिकाणी होत आहे हे काम म्हणजे मलमपट्टी केल्यासारखे आहे लाखो रुपये या कामासाठी खर्च दाखवला जातो हा पैसा जातो कुठे असा प्रश्न सदस्यानी केला पाट कुडाळ या रस्त्यावर अधिकाऱ्यानी आपली खाजगी वाहने चाल्लुन दाखवावीत असे आव्हानच यावेळी डॉ सुबोध माधव यानी दिले वालावल रस त्याचा संदेश नाईक यानी पोलखोल केला हायवेच्या पावशी येथिल कामाचा राजन जाधव यानी पाढा वाचला तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम म्हणजे घाणेरडे काम अशा शब्दात अरविंद परब यानी या विभागाच्या कामाची खिल्ली उडवली या चर्चेत मिलिंद नाईक मयुरा राऊळ शितल कल्याणकर प्राजक्ता प्रभु श्रेया परब आदी सदस्यानी भाग घेतला माणगाव कुंभारवाडी शाळेत देण्यात येत असलेला पोषण आहार खराब असल्याचे मयुरा राऊळ यानी मागच्या बैठकीत सागुन चौकशीची मागणी केली होती त्याचा अहवाल सादर करताना पालकाना विचारले असता धान्य चांगल असल्याचे .गट शिक्षणाधिकारी सुर्यभान गोडे यानी सांगताच त्याना सदस्यानी धारेवर धरले या चर्चत मथुरा राऊळ डॉ माघव राजन जाधव अरविंद परब आदी नी भाग घेतला सभापती व उपसभापती यानी पोषण आहाराची फेर चौकशी करावी असे आदेश दिल्यानंतर या विषयावर पडदा पडला पाट देसाईवाडी नळ पाणी योजना व पाट येथिल शौचालय प्रकरणी डॉ माधव यानी चर्चा केली शौचालय चार वर्ष वापरात नाही याचे कारण पाणी व लाईट या सुविधा नाहीत त्या दयाव्यात अशी मागणी केली एस स्टी स्थानकांच्या इमारत उदघाटन निम त्रण पत्रिकेत सभापती यांचे नाव नाही तसेच प्रस सदस्याना निमंत्रण नाही याबाबत एस्टी प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे तसे पत्र सभापती ना दिल्याची माहीती सभागृहात देण्यात आली यावर कुडाळ चे नगराध्यक्ष याचे नाव पत्रिकेत घालता कुडाळ शहराची लोकसंख्या किती असा प्रश्न राजन जाधव यानी करीत तात्मुक्याच्या सभापती ना वगळता सदस्याना डावलता याला काय म्हणावे असे विचारले तर अरविंद प२ब प्राजक्ता प्रभु संदेश नाईक आदी नी शालेय फेऱ्या सुरु करा अशी सुचना केली अंगणवाडी सेविकांच्या भरतीचा कार्यक्रम जाहीर झाल्याचे बैठकीत सांगण्यात आले असता ज्या अंगणवाडीत एकही मुल् नाही अशा अंगणवाडीच्या सेविका ना नजीकच्या अंगणवाडीत सामावुन घ्यावे अशी सुचना अरविंद परब यानी केली या चर्चेत राजन जाधव मिलिंद नाईक संदेश नाईक आदी नी भाग घेतला