कणकवली /-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील विकासकामांच्या संदर्भात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची संदेश पारकर यांनी आज भेट घेतली.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतीना प्राधान्याने विकासनिधी मिळावा तसेच कणकवली नगरपंचायतीला कायमस्वरुपी सिईओ मिळावा, यासाठी शिवसेना युवानेते संदेश पारकर यांनी माजी राज्यमंत्री आमदार दिपक केसरकर यांच्यासोबत महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची आज भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी संदेश पारकर यांच्यासोबत वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळु परब, माजी नगराध्यक्ष संदेश निकम,उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे,जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन वालावलकर आदी उपस्थित होते.