मुलींच्या महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झालेल्या कु.प्रणाली खोबरेकरचा माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांच्या हस्ते सत्कार

मुलींच्या महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झालेल्या कु.प्रणाली खोबरेकरचा माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांच्या हस्ते सत्कार

वेंगुर्ला /-

भाजपा सिंधुदुर्ग च्या वतीने माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांच्या हस्ते वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा – केरवाडी येथील मच्छिमार कुटुंबातील कु.प्रणाली पद्मनाभ खोबरेकर हिची मुलींच्या महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर भाजपा प्रदेश सरचिटणीस आम.रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष राजन तेली, आमदार नितेश राणे, प्रदेश चिटनीस प्रमोद जठार, माजी आम.अजित गोगटे,जि.प.अध्यक्षा समिधा नाईक,उपाध्यक्ष राजन म्हापसेकर,महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत , प्रदेश का.का.सदस्य शरदजी चव्हाण, भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई,जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे,ज्येष्ठ नेते राजु राऊळ,ज्येष्ठ नेते काका ओगले आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..