वेंगुर्ला /-

रेडी येथील टाटा मेटॅलिक प्रकल्प पुन्हा सुरू करावा किंवा नव्याने रोजगार निर्मिती प्रकल्प आणावा,या मागणीसाठी रेडी ग्रामस्थांच्या वतीने सावंतवाडी प्रांत कार्यालय येथे आज २६ जानेवारी रोजी उपोषण करण्यात आले.दरम्यान माजी पालकमंत्री व आमदार दिपक केसरकर यांनी १५ ऑगस्टपर्यंत रेडी येथे नवीन प्रकल्प आणण्याचे याबाबत अधिकृत घोषणा करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.
रेडी येथील टाटा मेटॅलिक प्रकल्प बंद झाल्यामुळे जिल्ह्यातील हजारो नागरिक बेरोजगार झाले आहेत.हा प्रकल्प पुन्हा सुरू करावा किंवा नव्याने रोजगार निर्मिती प्रकल्प आणावा या मागणीसाठी लोकप्रतिनिधी,सुशिक्षित बेरोजगार, युवक युवती आणि नागरिक या उपोषणास बसले होते.यावेळी रोजगार द्या,अन्यथा शेतकऱ्यांना जमिनी परत करा,अशी मागणी यावेळी करण्यात आली होती.यामध्ये जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ, रेडी सरपंच रामसिंग उर्फ भाई राणे,पं. स.सदस्य मंगेश कामत, उपसरपंच नामदेव राणे,
ग्रा.प.सदस्य श्रीकांत राऊळ, शैलेश तिवरेकर,गायत्री सातोसकर,
आनंद भिसे,राणी नरसुले,विनोद नाईक,सायली पोखरणकर,तंटामुक्ती समिती अध्यक्ष प्रभाकर राऊळ,तसेच ग्रामस्थ शेखर वारखणकर,संतोष राणे,स्वप्निल राणे,अनंत कांबळी आदींसह ग्रामस्थ उपोषणात सहभागी झाले होते.दरम्यान या उपोषणस्थळी जि. प.अध्यक्ष समिधा नाईक,शर्वाणी गावकर,समाजकल्याण सभापती शारदा कांबळे,शेखर गावकर,सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब,जि.प.सदस्य उन्नत्ती धुरी,जि. प.सदस्य दादा कुबल,मानसी धुरी,वसंत तांडेल,बांदा सरपंच अक्रम खान,शिरोडा सरपंच मनोज उगवेकर,भूषण सारंग,तुषार साळगावकर, समिर कुडाळकर, लक्ष्मीकांत कर्पे,जगन्नाथ राणे,टाटा मेटॅलिकचे माजी युनियन लिडर अरुण राणे,नामदेव राणे,राहुल गावडे,गफार खानापुरे,श्रीकांत परब व अन्य आदींनी उपोषणस्थळी भेट दिली.
दरम्यान दुपारी आमदार तथा माजी पालकमंत्री दिपक केसरकर यांनी उपोषणस्थळी भेट देत रेडी ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर १५ ऑगस्ट २०२१ रोजी सदर जागेमध्ये नवीन प्रकल्प आणण्यासंदर्भात जे प्रयत्न वर्षभर सुरू आहेत,ते प्रकल्प सुरू असलेबाबतची घोषणा १५ ऑगस्टपूर्वी करण्यात येईल.सदरचा प्रकल्प प्रदूषणमुक्त व रोजगार निर्माण करणारा असेल.रेडी गाव विकासासाठी गेली वीस वर्षे आपण प्रयत्न केले असून प्रकल्पाबाबत टाटा मेटॅलिकचे वरिष्ठ अधिकारी व ग्रामस्थांचे शिष्टमंडळ यांची एक ते दीड महिन्यात एक बैठक घडवून आणण्यात येईल,असे आमदार दिपक केसरकर यांनी लेखी आश्वासन यावेळी दिले.यावेळी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर,तहसीलदार म्हात्रे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page