कुडाळ /-
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री.प्रफुल्ल सुरेश सुद्रीक यांची सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी विशेष निमंत्रित म्हणून राज्याच्या राज्यपालांच्या आदेशानुसार नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत जवळकीचे संबंध असणारे श्री.प्रफुल्ल सुरेश सुद्रीक यांची निवड करण्यात आली आहे.प्रफुल्ल सुद्रीक यांचे सामजिक कार्य हे आज वर कायम सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सुद्रीक यांनी बऱ्याच तरुणांना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आपल्या परीने कायमच मदत कार्य केले आहे.या सर्वांगीण कामामुळेच त्यांची निमंत्रीत सदस्य पदी निवड करण्यात आली आहे.याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मिळणार आहे.ही सुद्रीक यांची निवड झाल्याने सामाजिक,राजकीय व ईतर क्षेत्रातुन प्रफुल्ल सुद्रीक यांचे कौतुक होताना दिसत आहे.