वेंगुर्ले पोलिस ठाणेच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान…

वेंगुर्ले पोलिस ठाणेच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान…

वेंगुर्ला /-

रस्ता सुरक्षा अभियान २०२१ अंतर्गत वेंगुर्ला पोलिस ठाणे च्या वतीने दाभोली नाका येथे सोमवारी २५ जानेवारी रोजी सडक सुरक्षा – जीवन रक्षा अभियान राबविण्यात आले.यावेळी नागरिकांना याबाबतच्या पत्रकांचे वाटप करण्यात आले.
यावेळी वेंगुर्ला पोलिस निरीक्षक तानाजी मोरे,जिल्हा वाहतूक शाखेचे पोवार,वारंग,पो.कॉ. अमर कांडर, वाहतूक पोलिस कॉ. मनोज परुळेकर,पांडुरंग खडपकर व अन्य उपस्थित होते.या अभियानबाबत – वाहन चालवताना आवश्यक हेल्मेट,सीटबेल्ट,आरशांचा वापर,वळणावर ओव्हरटेक करणे टाळावे,वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे टाळावे,अंमली पदार्थ सेवन करून वाहने चालवू नयेत, वेगावर नियंत्रण ठेवावे,दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे आदी बाबत माहिती देण्यात आली.

अभिप्राय द्या..