करूळ गावासाठी नवीन मोबाईल टॉवर बांधून नेट वर्कचा प्रश्न मार्गी लावावा..

करूळ गावासाठी नवीन मोबाईल टॉवर बांधून नेट वर्कचा प्रश्न मार्गी लावावा..

वैभववाडी

करूळ ता. वैभववाडी हा गाव सहयाद्रीच्या कुशीत वसलेला आहे.या गावासाठी कोल्हापूर – गगनबावडा येथील बीएसएनएल कंपनीचा मोबाईल टॉवर वरून नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे करूळ गावातील सहा वाडीतील जनतेला याचा त्रास सहन करावा लागत आहे. करूळ गावांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा येथील मोबाईल टॉवरवरून करूळ व अन्य तालुक्यातील गावातील जनतेला बीएसएनएल कंपनीच्या टॉवर वरून नेट वर्क मिळत आहे.गेली अनेक वर्षे या टॉवर वरून कधी नेट मिळते तर कधी नेट गायब झालेले असते.सध्या करूळ गावातील सुमारे 1500 लोक बीएसएनएल मोबाईलचा वापर करत आहेत.दर महिना प्रत्येक व्यक्ती 200 रुपये प्रमाणे नेट पॅक रिचार्ज करत आहेत.सुमारे 30 हजार रुपये गावातून दर महिना कंपनीला मिळत आहेत.त्यामुळे कंपनी कडून जनतेला दर्जेदार सेवा मिळावी ही अपेक्षा आहे .कोविड 19 मुळे सध्या करूळ गावामध्ये मुंबई व अन्य जिल्ह्यातून शेकडो चाकरमानी आलेले आहेत.त्याची मुले व स्थानिक लोकांची शाळेतील मुलांना ऑनलाईन अभ्यास दिला जातो.मात्र बरेच वेळा नेट नसल्याने मुलांना ऑनलाईन अभ्यास करतांना व्यत्यय येत असतो.त्याच प्रमाणे शिक्षकांशी संवाद साधतांना अनेक अडचणी येत आहेत.तसेच काही वेळा वयोवृद्ध व्यक्ती आजारी पडली तर रिक्षा व अन्य खाजगी वाहन बोलावण्यासाठी अनेक वेळा वाहन चालकाशी संपर्क होत नाही.अशा अनेक समस्या येत आहेत प्रसंगी आजारी व्यक्ती दगावण्याची शक्यता असते.करूळ भट्टीवाडी येथे मोबाईलसाठी एखाद्या कंपनीचा टॉवर व्हावा म्हणून स्थानिक ग्रामस्थ करारावर जमीन कंपनीला देण्यासाठी तयार आहेत. सध्या करूळ गावातील भट्टीवाडी, दिंडवणे,खडकवाडी,गावठाणवाडी अ ,गावठाणवाडी ब,डोनावाडी,केगदवाडी या सहा वाडयांना बीएसएनएल कंपनीचे नेट वर्क पावसाळ्यात मिळत नाही.जानेवारी – फेब्रुवारी नंतर मे महिन्याच्या अखेर नेट मिळते.या बाबत करूळ गावातील लोकांनी गगनबावडा येथील बीएसएनएल कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता दर वेळी वेगवेगळ्या समस्या येत असल्याचे सांगत आहेत.करूळ गावात नवीन मोबाईल टॉवर बांधून मोबाईल नेट चा प्रश्न मार्गी लावावा असे कुरुळ ग्रामस्थ व मुंबईतील चाकरमाण्यांची मागणी आहे.

अभिप्राय द्या..