मसुरे /-

कोकण रेल्वेचे शिल्पकार,
वर्गविहीन रेल्वे सुरु करणारे
रेल्वेमंत्री, शेतकऱ्यांचे हित जपणारे अर्थमंत्री, कोकणचे लोकसभेत ५ वेळा प्रतिनिधीत्व करणारे खासदार मधू दंडवते यांची जयंती बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा शाखेत साजरी करण्यात आली.
खासदार, अर्थमंत्री, रेल्वेमंत्री, नियोजन मंडळाचे उपाध्यक्षपद अशा अनेक उच्चपपदावर काम करताना त्यांचा गांधीवादी व समाजवादी विचार अखंडपणे त्यांच्या सोबत होता. त्या कोकण विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी युवकांनी तत्पर असले पाहिजे असे प्रतिपादन सेवांगण कट्टाचे अध्यक्ष श्री. किशोर शिरोडकर यांनी केले.
यावेळी हर्षदा पराडकर, स्वाती पोखरणकर, प्रियांका वाईरकर, समिक्षा हडकर, हर्षाली चव्हाण, प्रतिक्षा हिर्लेकर, प्रतिक्षा गावडे यानी
धडपडणारा शाम, तीन पैशाचा तमाशा, मार्टीन ल्यथर किंग या पुस्तकातील लेखाचे वाचन केले.
सेवांगण कट्टाचे अध्यक्ष किशोर शिरोडकर व दीपक भोगटे यानी प्रा. मधु दंडवते
यांच्या कार्याची यावेळी ओळख करून दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page