कातवड येथे आंबा पीक शेती शाळा मेळावा..

कातवड येथे आंबा पीक शेती शाळा मेळावा..

मसुरे /-

कातवड येथील शेती शाळेमध्ये गावराई कुडाळ येथील शेती तज्ञ शेतकरी श्री संतोष सामंत व स्नेह ऑरगॅनिक नेरूर कुडाळ चे सेंद्रीय शेती तज्ञ श्री सुर्यकांत कुंभार यांनी आंबा व काजू उत्पादन वाढीसाठी तसेच कीड- रोग व्यवस्थापन ,शेतीपूरक उद्योग, भाजीपाला लागवड मार्गदर्शन केले. तसेच कोकणी मेव्याचे स्टॉल उभारणे, पर्यटकांसाठी ऍग्रो टुरिझम उभारणे याबाबत आंबपिक शेतकरी शेतीशाळेमध्ये मार्गदर्शन केले यावेळी तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी, कृषि पर्यवेक्षक धनंजय गावडे, कातवड सरपंच उदय नाईक,उपसरपंच गणेश चव्हाण, शेतकरी सुरेश परब, अरुण परब, सुजय घाडी, काशीनाथ चव्हाण,नंदकिशोर टिकले ,वैभव नाईक,भाग्यश्री चव्हाण, वंदना चव्हाण उपस्थित होते. सदर कार्यक्रम तालुका कृषी अधिकारी मालवण यांचे मार्फत कीड रोग सेवा व सल्ला प्रकल्पा अंतर्गत कातवड येथील अरुण परब यांचे आंबा प्रक्षेत्रावर दर मंगळवारी चालू असून
वेगवेगळे तज्ञ मार्गदर्शक याठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. आतापर्यंत नऊ शेतीशाळा वर्ग झाले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..