आचरा येथील रामेश्वर मंदिरात स्थानापन्न झालेल्या गणेश मुर्तीचे अगदी साध्या पद्धतीने आचरा पारवाडी येथील नदीत २१दिवसांनी विसर्जन करण्यात आले.
आचरा येथील रामेश्वर मंदिर येथे दर वर्षी बेचाळीस दिवसांचा गणपती उत्सव साजरा केला जात होता.मात्र या वर्षी कोरोना महामारी मुळे हा उत्सव केवळ एकविस दिवसांपुरताच मर्यादित करण्यात आला होता.रामेश्वर मंदिरही दर्शनासाठी बंद असल्याने गणपती बाप्पाची पुजा अर्चाच केली जात होती. .शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पारंपरिक वाद्यांच्या साहाय्याने गणपती आचरा पारवाडी ब्राम्हण देव मार्गे विसर्जनासाठी पारवाडी नदी किनारी आणण्यात आला.त्यानंतर पारवाडी ग्रामस्थांच्या सहकार्याने गणपतीचे विसर्जन करण्यात आले.यावेळी आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.