वेंगुर्ला येथे नगरपरिषद कर्मचाऱ्यांसाठी फिजिओथेरपी शिबीर संपन्न..

वेंगुर्ला येथे नगरपरिषद कर्मचाऱ्यांसाठी फिजिओथेरपी शिबीर संपन्न..

वेंगुर्ला /-

वेंगुर्ले नगरपरिषद व धन्वंतरी केंद्र सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने न.प.कर्मचारी यांच्यासाठी वेंगुर्ले येथे फिजिओथेरपी उपचार शिबीर संपन्न झाले.यामध्ये सुमारे १०० कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली.
या शिबिराचे उदघाटन नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.यावेळी मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे,नगरसेविका शितल आंगचेकर, श्रेया मयेकर, कृपा मोंडकर,प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल,धन्वंतरी केंद्र सावंतवाडी चे डॉ. श्रीवर्धन आरोसकर,सहकारी आदी उपस्थित होते.या शिबिरामध्ये शुगर,ब्लडप्रेशर तसेच फिजिओथेरपी ट्रीटमेंट आदी तपासणी करण्यात आली.तसेच कर्मचारी यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.तसेच आवश्यकता भासल्यास केंद्राशी संपर्क साधावा.फिजिओथेरपी बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

अभिप्राय द्या..