निलेश मोर्वेकर ‘अ‍ॅवॉर्ड ऑफ करेजने’ सन्मानीत..

निलेश मोर्वेकर ‘अ‍ॅवॉर्ड ऑफ करेजने’ सन्मानीत..

मसुरे /-

मालवण तालुक्यातील बांदिवडे मळावाडी गावचा सुपुत्र निलेश रविंद्र मोर्वेकर याचा कोरोना काळातील धाडसी सेवे बद्दल अंधेरी- मुंबई येथील होली स्पिरीट हॉस्पिटल कडुन नुकताच अ‍ॅवॉर्ड ऑफ करेज हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कोरोनाने मुंबईत धुमाकुळ घातला असताना अनेक कर्मचारी हॉस्पिटलला अनुपस्थित रहायचे, काही जण नोकरी सोडून सुद्धा गेले होते. परंतु मोर्वेकर यानी जिवावर उदार होत हॉस्पिटलसाठी सेवा दिल्याने सदर पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला. अ‍ॅवॉर्ड ऑफ करेज हा पुरस्कार मिळाल्या बद्दल निलेश यांचे अभिनंदन होत आहे.

अभिप्राय द्या..