कुडाळ नगरपंचायतीचे १० फेब्रुवारी रोजी आरक्षण..

कुडाळ नगरपंचायतीचे १० फेब्रुवारी रोजी आरक्षण..

कुडाळ /-

राज्यातील १ नगरपरीषद व ४ नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणकीचा आरक्षण स़ोडत कार्यक्रम जाहीर झाला. त्यानुसार कुडा नगरपंचायतची आरक्षण सोडत १० फेब्रुवारी २०२१ रोजी होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.
कुडाळ नगरपंचायतीच्या विद्यमान सदस्यांची मुदत ११ मे २०२१ मध्ये संपणार आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक आरक्षण व प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार १ फेब्रुवारी पासून प्रभाग रचना व प्रभाग रचनेबाबतचा अहवाल नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी यांना पाठविणार आहेत. त्याबाबत हरकती व मान्यतेची कार्यवाही होईल. १० फेब्रुवारी २०२१ रोजी कुडाळ नगरपंचायतीचे आरक्षण सोडत होईल.या आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जाती व जमाती, त्यातील महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग त्यातील महिला आणि सर्वसाधारण महिला यासाठी हे आरक्षण पडणार आहे. हरकती व सूचना मिळाल्यानंतर ५ मार्च रोजी विभागिय आयुक्त त्यास संमती देतील.

अभिप्राय द्या..