वेंगुर्ला /-
वेंगुर्ले तालुक्यातील आरवली ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का देत भाजपाने सत्ता काबीज केली. एकुण ९ जागेपैकी ५ सदस्य विजयी होऊन भाजपाचा झेंडा फडकवला .
आरवली ग्रामपंचायतीत ह्यापूर्वी भाजपाचा एकही सदस्य नसताना जोरदार मुसंडी मारत पहील्यांदा पाच सदस्य निवडुन आणत शिवसेनेला धोबीपछाड दिला त्यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. गेली चार वर्षे भाजपाच्या माध्यमातून आरवली मध्ये विविध लोकोपयोगी उपक्रम राबवून जनमानसात विश्वासार्हता निर्माण केली आहे, त्यामुळेच जनतेने भाजपाच्या बाजुने कौल दिला. रेडी – शिरोडा – आरवली येथील भाजपा कार्यकर्त्यांनी जि.प.सदस्य प्रीतेश राऊळ , प्रचार प्रमुख शिरोडा सरपंच मनोज उगवेकर , सह प्रचार प्रमुख ता.उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे यांच्या नेतृत्वाखाली एकसंघपणे प्रचाराची यंत्रणा राबवली. तसेच तालुकास्तरावरील महिला व पुरुष पदाधिकारी यांनी मोलाची साथ दिली .त्यामुळेच यशाचा मार्ग सुकर झाला .यावेळी तालुका कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई , रेडी जि.प.सदस्य प्रीतेश राऊळ , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , शिरोडा सरपंच मनोज उगवेकर , ता. उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर , जि.का.का.सदस्य वसंत तांडेल ,ज्येष्ठ नेते प्रकाश रेगे , महादेव नाईक , अमीत गावडे , शरद मेस्त्री , रेडी शक्ती केंद्र प्रमुख जगंन्नाथ राणे , शिरोडा शक्ती केंद्र प्रमुख विद्याधर ऊर्फ सतिश धानजी , युवा मोर्चा चे संदीप पाटील ,शिरोडा शहर अध्यक्ष संदीप धानजी , विनय मेस्त्री , संतोष अणसुरकर , सुभाष कांबळी , केशव नवाथे , त्रीवेणु चिपकर , रविंद्र मेस्त्री , नंदीनी आरोलकर , शिल्पा चिपकर , नितीश कुडतरकर , लक्ष्मण पेडणेकर , पुरुषोत्तम धानजी , विजय मयेकर , भुषण आरोलकर , चैतन्य मेस्त्री , हर्ष परुळेकर , लक्षणा परुळेकर , संतोष मातोंडकर इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .यावेळी रीमा मेस्त्री , समीर कांबळी , शिला जाधव , तातोबा कुडव व सायली कुडव या विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला .