वेंगुर्ला /-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय महाविद्यालय व्हावे,ही गेली ३०-३५ वर्षे सिंधुदुर्ग वासीयांची अपेक्षा होती.महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर व उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यांनंतर गेल्या वर्षभरात कोव्हिड चे संकट असतानाही जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्गात करण्याचा निर्णय घेतला आहे.या मेडिकल कॉलेजच्या पाठपुरावा साठी खासदार विनायक राऊत,आमदार दिपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.सिंधुदुर्ग मध्ये हे वैद्यकीय महाविद्यालय उभे राहील, त्यावेळी मोठे समाधान असणार आहे,असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी वेंगुर्ला येथे केले.
वेंगुर्ला तालुका शिवसेना व अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्लेत १७ जानेवारी रोजी मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पालकमंत्री उदय सामंत बोलत होते.यावेळी व्यासपीठावर खासदार विनायक राऊत,आमदार दिपक केसरकर,सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब ,शिवसेना वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब,जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन वालावलकर,
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,नेते संदेश पारकर,
मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे,उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ,नगरसेवक संदेश निकम,वैद्यकीय अधिक्षक डॉ.पी.डी.वजराटकर,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीमंत चव्हाण
उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे व बाळा दळवी,आबा कोंडसकर,
शहरप्रमुख अजित राऊळ,डॉ.श्रीकांत माने,डॉ. राहुल पाटील,डॉ.बसवराज कडलगे,डॉ.सौरभ गांधी,युवासेना तालुका अधिकारी पंकज शिरसाट,विवेकानंद आरोलकर,सुयोग चेंदवणकर,माजी उपनगराध्यक्ष रमण वायंगणकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी दिपक केसरकर यांनी राज्याचे मंत्री असताना महाराष्ट्रात सर्वात जास्त निधी आरोग्य सेवेवर खर्च करण्याचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्याने मिळविला.खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली आडाळी येथे देशातील सर्वात मोठा प्रकल्प होत आहे.याला केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनीही सहकार्य केले आहे.आरोग्याच्या बाबतीत सर्वसामान्यांना लागणारे सहकार्य करण्याची जबाबदारी शिवसेना म्हणून पार पाडू,असे सामंत म्हणाले.
यावेळी खा.राऊत म्हणाले कि,आमदार दिपक केसरकर यांच्या माध्यमातून वेंगुर्लेतील ग्रामीण रुग्णालय पूर्णत्वास येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले आहे. येत्या काळात जिल्ह्यात डॉक्टरांची असलेली कमतरता दूर होऊन वेंगुर्ल्यातीलहि हे नवीन रुग्णालय जनतेच्या सेवेत रुजू होईल असे आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी वेंगुर्लेत दिले.
आमदार दिपक केसरकर म्हणाले कि, वेंगुर्लेतील हॉस्पिटल मुळे सर्वसामान्यांना फायदा होणार आहे.अन्य आवश्यक सुविधा पूर्ण करण्यात येतील.डॉ. दिपक सावंत यांनी विविध परवानग्या बाबत चांगले काम केले आहे.अथर्व हॉस्पिटल तसेच सचिन वालावलकर व वेंगुर्ला तालुका शिवसेना टीमने आरोग्य शिबीर आयोजित करून चांगले काम केले आहे.शहराबरोबरच ग्रामीण भागातही अशी आरोग्य शिबिरे होतील,अशी ग्वाही त्यांनी दिली. सर्वप्रथम दिपक केसरकर यांनी ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली.त्यानंतर खासदार राऊत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.कार्यक्रमात खासदार यांच्या हस्ते कोल्हापूर येथील डॉक्टर,डॉ.पी.डी. वजराटकर,पत्रकार दिपेश परब,वेंगुर्ला मेडिकल टीम वगैरेंचा शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे स्वागत डॉ.वजराटकर,प्रास्तविक सचिन वालावलकर,सूत्रसंचालन काका सावंत व आभार तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी मानले.या शिबिरात सुमारे चारशे जणांची तपासणी करण्यात आली.यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर,डॉ. प्रल्हाद मणचेकर,डॉ.कोळमकर,डॉ.चव्हाण तसेच शिवसेनेच्या सुकन्या नरसुले,मंजुषा आरोलकर,नगरसेविका सुमन निकम,सुरेश भोसले,मनोहर येरम आदींसह शिवसेना पदाधिकारी – कार्यकर्ते उपस्थित होते.कोव्हिड नियमांचे योग्य पालन करून हे शिबिर संपन्न झाले.