कुडाळ तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींवर निवडणुकीत शिवसेनेचे वर्चस्व…

कुडाळ तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींवर निवडणुकीत शिवसेनेचे वर्चस्व…

आमदार वैभव नाईकांच्या उपस्थित शिवसैनिकांकडून जल्लोष..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यातील सर्वाधिक ५ ग्रामपंचायतींवर शिवसेनेने विजय मिळवला आहे.यामध्ये वसोली,कुसबे-पोखरण,आकेरी,गिरगाव कुसगाव,माडयाचीवाडी या ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली व खासदार विनायक राऊत,पालकमंत्री उदय सामंत,कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा विजय शिवसेनेने संपादन केला आहे.

यावेळी श्री.नाईक यांच्या उपस्थितीत कुडाळ शिवसेना शाखेत पक्षाच्या विजयी सर्व उमेदवारांना हार घालून अभिनंदन करण्यात आले बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो,शिवसेना जिंदाबाद,अशा घोषणा देत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला.यावेळी विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, जी.प गटनेते नागेंद्र परब, तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे,युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, अतुल बंगे,राजू कविटकर, शहरप्रमुख संतोष शिरसाट, उपसभापती जयभारत पालव, वर्षा कुडाळकर, श्रेया परब, सचिन काळप, दीपक आंगणे, सुशील चिंदरकर,राजू गवंडे, नितीन सावंत,रुपेश पावसकर आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

अभिप्राय द्या..