कुडाळ /-
अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तेर्सेबांबर्डे येथिल तरुण जागीच ठार झाला. हा अपघात काल रात्री अडीज वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर झाराप येथे घडला.अपघातानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याला अधिक उपचारासाठी कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले होते.मात्र उपचारापुर्वीच त्याचे निधन झाल्याचे वैदयकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.याबाबतची नोंद कुडाळ पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.याबाबतची माहीती हवालदार श्रीरंग टक्केकर यांनी दिली. याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधीत तरुण आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन जात असताना अज्ञात वाहनाने त्याला धडक देत पलायन केले.या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली.दरम्यान त्या ठिकाणावरून जाणाऱ्या अन्य वाहनचालकांनी प्रसंगावधान राखत उपचारासाठी त्याला कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.मात्र उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.यावेळी रात्री त्यांना रामदास जाधव व अन्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.तर संबधित ठोकर देवून पळून जाणारी गाडी कोण याचा तपास कुडाळ पोलिस करीत आहेत.